मंत्री नितेश राणे यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद
वैभववाडी | प्रतिनिधी : राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे व्यापारी मेळावा निमित्त नाधवडे येथे हॅलीकाॅप्टरने आगमन झाले. पालकमंत्री झाल्यानंतर पहील्यांदाच मंत्री नितेश राणे यांचे आगमन होताच वैभववाडी वासियांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. नाधवडे येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ही मंत्री नितेश राणे यांचे स्वागत केले. सर्व बालचमुंची मंत्री नितेश राणे यांनी विचारपूस केली.
वैभववाडी भाजपा पदाधिकारी यांनी देखील नितेश राणे यांचे स्वागत केले. यावेळी भाजपा वैभववाडी अध्यक्ष सुधीर नकाशे, शाळेचे मुख्याध्यापक संजय पाताडे व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.










