खांबाळेत स्वच्छता अभियान : भैरी तलाव आणि परिसर केला स्वच्छ

शेकडो ग्रामस्थ व कर्मचारी सहभागी

वैभववाडी प्रतिनिधी :
खांबाळे येथील भैरी तलाव, नळपाणी पुरवठा योजनेची विहीर, आणि परिसर खांबाळे ग्रामस्थांनी स्वच्छ केला. या स्वच्छता अभियानात गावातील १०० हुन अधिक ग्रामस्थ सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाला सर्वत्र सुरूवात झाली आहे. या अभियानात सहभागी झालेल्या ग्रामपंचायत खांबाळेने संपुर्ण गावाला पिण्याचा पाणीपुरवठा होत असलेल्या भैरी तलाव,नळपाणी पुरवठा विहीर परिसर स्वच्छतेने शुभांरभ केला आहे. ग्रामपंचायतीने रविवारी स्वच्छता मोहीमेचे आयोजन केले होते. या स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ सरपंच प्राजक्ता कदम यांच्या हस्ते झाल्यानतंर गावातील शेकडो ग्रामस्थांनी भैरी तलावामध्ये साचलेली शेवाळ, पावसामुळे वाढलेले तण, विहीरीनजीक वाढलेले तण आदीची साफसफाई करण्यास सुरूवात केली. या अभियानात महिलांचा सहभाग मोठा होता. तब्बल तीन तास परिसराची स्वच्छता सुरू होती. स्वच्छतेनतंर तलाव परिसर चकाचक झाल्याचे दिसुन आले.

या स्वच्छता मोहीमेत माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, उपसरपंच मंगेश गुरव, माजी सरपंच मंगेश कदम, माजी सरपंच संचिता गुरव, माजी सरपंच लक्ष्मी सुतार, माजी उपसरपंच गणेश पवार, ग्रामसेवक सेजल गुरखे, पोलीस पाटील रूपेश कांबळे, पोलीस पाटील राखी पवार, अस्मिता चव्हाण, दिपक चव्हाण, सुनील पवार, प्रमोद लोके, ज्ञानदेव पवार, सकेंत पवार, सुप्रिया साळुंखे, जयश्री पवार, सुनिता पवार आदी सहभागी झाले होते.
फोटो – खांबाळे येथील भैरी तलाव आणि विहीर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.