‘कोकाकोला’ कंपनी वाद १५ जणांवर गुन्हे

 

खेड(प्रतिनिधी तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत विस्तारीत

असगणी येथील कोकाकोला कंपनीत बेकायदेशीरपणे जमाव करत केलेल्या राड्याप्रकरणी शिंदे शिवसेनेच्या १५ हून अधिक पदाधिकाऱ्यांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत कंपनीच्या सुरक्षारक्षकाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

असगणी येथे कोकाकोला कंपनी उभारण्याचे काम सुरू आहे. या कंपनीत स्थानिक तरुणांना सामावून न घेता परप्रांतियांना स्थान दिले जात असल्याचे निदर्शनास.आले. यानंतर संतप्त शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनीत घुसून परप्रांतीय कामगारांना हुसकावून बाहेर काढत काम बंद पाडले होते. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही धारेवर धरण्यात आले होते. स्थानिकांना सामावून घेण्याबाबत निर्णय होल नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, अशी तंबी शिवसेनेने कंपनीला दिली होती.

या प्रकारानंतर कंपनीचे कामकाज ३-४ दिवस बंद होते. दरम्यान, बेकायदेशीरपणे जमाव करत कंपनीत घुसून शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार कंपनीच्या सुरक्षारक्षकाने पोलीस ठाण्यात दिली या मुळे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला या प्रकारा नंतर बंद असलेले कंपनीचे कामकाज गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.