रत्नागिरी जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांची लो.टिळक स्मारक वाचन मंदिराला भेट 

चिपळूण :रत्नागिरी जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांनी लो.टिळक स्मारक वाचन मंदिराला भेट दिली. वाचन प्रेरणा पंधरवडा निमित्त खेड येथे आयोजित कार्यक्रमाला जाताना चिपळूण येथे आवर्जून लो.टिळकवाचन स्मारक वाचन मंदिराला भेट दिली. चिपळूण येथेवाचन प्रेरणा पंधरवड्यात काय कार्यक्रम आयोजित केले आहेत यावर त्यांनी चर्चा केली. चिपळूणला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद संयुक्तपणे घेणार असलेले उपक्रम कोमसापचे श्री विनायक ओक यांनी सांगितले.

 

या उपक्रमांतर्गत ‘ मला आवडलेले पुस्तक ‘ या विषयावर लेखन स्पर्धा आणि स्वरचित कविता स्पर्धा घेणार असल्याचे ऐकून त्यांनी आनंद व्यक्त केला. लोटिस्माने निर्माण केलेले कलादालन पाहिले. हे कलादालन म्हणजे कोकणातील बुध्दीसंपन्नता दर्शविणारी आहे अशा शब्दांत आनंद व्यक्त केला. लोटिस्माच्या वतीने श्रीमती शुभांगी साठे यांचा शाल व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला.