चाफेट येथील श्री स्वयंभू दुर्गादेवी मंदिराचा बुधवारी वर्धापन दिन सोहळा

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील चाफेट येथील श्री स्वयंभू दुर्गादेवी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे .

या वर्धापन दिन सोहळ्या अंतर्गत बुधवारी सकाळी ८ ते दुपारी १.०० विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी १ ते १.३० आरती त्यानंतर दुपारी १.३० ते ३ स्नेहभोजन. सायंकाळी ४ ते ५.३० हळदीकुंकू समारंभ होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता आरती, सायंकाळी ७ ते ८ भजन आणि रात्री १० वाजता बहुरंगी पारंपरिक नमनाचा कार्यक्रम पार पडणार आहे .
तरी या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चाफेट ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.