गाडी दुरुस्तीची सबब, प्रवाशांत संताप
खेड(प्रतिनिधीं) ग्रामीण भागातून परतणाऱ्या बसफेऱ्या येथील बसस्थानका ऐवजी थेट महाडनाका येथील आगारात वळत आहेत. त्यामुळे स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी प्रवाशांना अन्य बसची तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. याबाबत बसफेरीमध्ये बिघाडाची. सबब पुढे केली जात असल्याने प्रवाशांचा मनस्ताप कायम आहे.
एकीकडे नादुरुस्त बसफेऱ्यांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. या फेऱ्या ग्रामीण भागात मार्गस्थ झाल्यानंतर भर. रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे नादुरुस्त स्थितीतील बसफेऱ्या ग्रामीण भागात मार्गस्थ केल्या जात आहेत. याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यातच ग्रामीण भागात मार्गस्थ झालेल्या तांत्रिक बिघाड झाल्याची सबब प्रवाशांसमोर बसेस परतीच्या प्रवासात बसस्थानकापर्यंत पुढे केली जात आहे. यामुळे प्रवाशांना न पोहचता थेट आगारात जात असून अन्य बसने पुढची वाट धरावी लागते. प्रवाशांना महाडनाका येथील आगाराच्या यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून प्रवेशद्वारासमोरच उतरवण्यात येते. बसमध्ये हा प्रकार थांबवण्याची मागणी हाते आहे.










