शेतकरी वर्गाला विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन
गुहागर |प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याबाबत मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विविध योजनांची माहिती देणे व त्यावर अंमलबजावणी करणे याबाबत नुकतेच तळवली ग्रामपंचायत कार्यालय येथे शिबिर पार पडले.
यामध्ये गट मधील नावात दुरुस्ती,मयत खातेदारांचा वारस तपास,गट सदरील सहहिस्सेदार नोंद करणे, ॲग्री स्टॅक योजनेची माहिती व आधार लिंक करणे,संजय गांधी, श्रावणबाळ योजना,पी एम किसान योजना,ई-पीक पाहणी इत्यादी योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.यावेळी तळवली सरपंच मयुरी शिगवण, उपसरपंच संतोष जोशी,मंडळ अधिकारी श्री जाधव,पोलिस पाटील विनोद पवार,तलाठी भिसे,सर्व सेवा केंद्रचालक विधी जडयाळ,कर्मचारी सुरज गिजे, अपर्णा जोशी व ग्रामस्थ उपस्थित होते.










