देवगड जामसंडे चे ग्रामदैवत असणाऱ्या दिर्बादेवी च्या अवसराने देवगड मधील ब्राह्मणदेव मंदिरातील नंदी काढून आणण्याचा आदेश केल्याने आज हा नंदी ब्राह्मण देव मंदिरातून रामेश्वर मंदिरात हलवण्यात आलं आहे
दिर्बादेवी च्या अवसराने व शिवकळेने देवगड शहरातील ब्राह्मण देव मंदिरातील नंदी काढून आणण्याचा हुकूम केला होता
आज मानकरी यांनी या नंदीची आरती विधिवत पूजा व अभिषेक करून हा नंदी काढून दिर्बादेवी मंदिरात आणला आहे
याबाबत देवगड शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबतची माहिती चंद्रकांत कावले यांनी दिली.












