तालुक्यातील देवधे मणचेकरवाडी येथील घटना
लांजा (प्रतिनिधी) दारूच्या नशेत २६ वर्षीय तरुणाने घरातील वाशाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी तालुक्यातील देवधे मणचेकर वाडी येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील देवधे मणचेकर वाडी येथील देवेंद्र राजेंद्र मणचेकर( वय २६) याला दारूचे अति व्यसन होते. यातूनच त्याने बुधवारी रात्री आपल्या आई-वडिलांशी भांडण करून त्यांना घरातून हाकलून दिले होते. त्यामुळे ते आपल्या पाली येथील नातेवाईकांकडे राहायला गेले होते. आज गुरुवारी दुपारी घरात कोणी नसताना देवेंद्र याने दुपारच्या सुमारास घरातील छपराच्या लाकडी वाशाला गळफास लावून आत्महत्या केली होती. देवेंद्र याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब त्याचा भाऊ प्रथमेश मणचेकर यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्याला साडीचा फास सोडवून खाली उतरवले.
याप्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू ची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.










