काही प्रवासी जखमी
दोन्ही कारचे मोठे नुकसान
मुंबई गोवा महामार्गावर वागदे पेट्रोल पंप नजिक चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने दोन कार अपघातग्रस्त झाल्या. काही प्रवासी जखमी होऊन दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मालवण येथील तांडेल कुटुंबीय टाटा अल्ट्रास (mh 07 ag 7116) या कारमधून पंढरपूर दर्शन करून मालवणच्या दिशेने जात होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून पलीकडील लेन वर पलटी झाली. याच वेळी रांनबांबुळी (मालवण) येथील प्रवासी इनोवा कार मधून ( mh 04 9878) मुंबई च्या दिशेने जात होते. इनोवा चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाहेर वळवली. मात्र त्याचेही गाडीवरील नियंत्रण सुटल्याने इनोवा दुभाजक ओलांडत दुसऱ्या लेन वर जाऊन थांबली. इनोवा मधील प्रवासी सुदैवानेच बचावले. मात्र.चारही टायर फुटले असून अल्त्रोस कारचे मोठे नुकसान झाले या कारमधील प्रवासी जखमी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.










