खेड(प्रतिनिधी)
तालुक्यातील देवघर-सोंडे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा ५.० अभियान प्रभावीपणे राबवताना महिला बचतगटाच्या सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. सरपंच सुनील मोरे, उपसरपंच नामदेव सोंडकर, ग्रामपंचायत अधिकारी दीपक कदम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अभियान यशस्वी करण्यासाठी अविरतपणे झटत आहेत. ग्रामपंचायतीच्या दिमतीला ग्रामस्थांपाठोपाठ महिला बचतगटही सरसावले असून रॅली काढून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आहेत. दीपक कदम व कर्मचारी हे अभियान यशस्वी करण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमांना शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही मोठा प्रतिसाद लाभत आहे.







