रत्नागिरी : शनिवार दिनांक 08 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 02 वा. कुवारबाव, रत्नागिरी येथे कार्याध्यक्ष निलेश लाड यांच्या कार्यालयात तालुकाध्यक्ष चंद्रकांत रामचंद्र भुवड यांच्या अध्यक्षतेखाली मासिकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
जनसेवेचा वसा घेऊन कायम निपक्ष पणे प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाऊन पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करणारी संघटना असा नावलौकिक आज या संघटनेचा आहे. अनेक पीडित व्यक्तींना न्याय देण्याचे सामाजिक कार्य ही संघटना गेली अनेक वर्षे करीत आहे.
या रत्नागिरी तालुका पदाधिकाऱ्यांच्या सभेला तालुका उपाध्यक्ष : हरेश गुरव, तालुका उपाध्यक्ष : जीया अहमद मुल्ला, तालुका कार्याध्यक्ष : निलेश लाड, तालुका सचिव : विनायक गावडे, तालुका सहसचिव : अखळाक काद्री, तालुका खजिनदार : सुनिल सनगरे, तालुका निरीक्षक : श्री . कांबळे, तालुका संघटक : संजय ( शिवा ) पाटणकर, सुनील नलावडे, श्री. घाणेकर, अभिजित पंडित व इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.











