खेड (प्रतिनिधी) शहराजवळील भडगांव- शेवरवाडी येथील श्रीविठ्ठल रखुमाई मंदिराचा १९ वा वर्धापनदिन सोहळा सोमवार दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी उत्साहात साजरा होणार आहे.
यावेळी सकाळी ९ – अभिषेक, सकाळी १०- घटस्थापना, सकाळी ११-दिंडी ध्वजारोहन, सायंकाळी ६:३० – खोंडे जोगळेवाडी यांचा हरिपाठ, रात्रौ ७:३० ते ९:३०- महाप्रसाद आणि रात्रौ १० वाजता चाकाळे येथील महालक्ष्मी जाखमाता मंगळागौर यांच्या मंगळागौर कार्यक्रमाने वर्धापनदिन सोहळ्याची सांगता होणार आहे.










