गटार बंदिस्त करण्याची पेंडखळे माजी सरपंच दिवाकर सुर्वे यांची मागणी
राजापूर (वार्ताहर): राजापूर नगर परिषद हद्दीतील जकातनाका ते जवाहरचौक या मुख्य रस्त्यावर पोष्ट कार्यालयासमोर असलेल्या एसटी थांब्यानजीक असलेले धोकादाय उघडे गटार बंदिस्त करण्यात यावे अशी मागणी पेंडखळे गावचे माजी सरपंच दिवाकर सुर्वे यांनी राजापूर नगर परिषदेकडे केली आहे.
त्याचबरोबर रानतळे येथे निवारा शेड बांधण्यात यावी अशीही मागणी श्री. सुर्वे यांनी केली आहे.
ग्रामिण भागातून येणाऱ्या एसटी बसेस राजापूर पोष्ट कार्यालसमोर थांबतात. या ठिकाणी विविध कामांसाठी उतरणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी असते. मात्र या ठिकाणी अरूंद रस्ता आणि रस्त्यालगतच एक फुटावर असलेले उघडे गटार असल्याने वृध्द व महिला प्रवाशांना त्रास होत आहे. तरी उघडे गटार बंदिस्त करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
तर जकातनाका ते जवाहरचौक या मार्गावर प्रवासी निवारा शेड बांधण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर रानतळे येथे निवारा शेड बांधण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे श्री. सुर्वे यांनी केली आहे.
————————————————————–












