खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील नांदगाव मोहल्ला येथे मगर असल्याची माहिती श्री. अनिल खोपकर खेड पोलीस स्टेशन यांनी दुरध्वनीव्दारे वन विभागाला दिली. कळविलेल्या माहितीचे अनुषंगाने आलेल्या मगरीचे रेस्क्यु करणेसाठी वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदरच्या मगरीला चिपळूण वनविभागाने नव्याने विकसीत केलेल्या लोखंडी पिंजऱ्यात वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत सुरक्षीतरित्या ताब्यात घेण्यात आले व ती सुरक्षित असल्याची खात्रीकरून घेवुन नैसर्गिक अधिवासात सुखरुप सोडून देण्यात आले.
या बचाव कार्यातमध्ये श्री. सुरेश उपरे वनपाल खेड, वनरक्षक, श्री. परमेश्वर डोईफोड, श्री. रानबा बंबर्गेकर, श्री. अशोक ढाकणे, वन्यजीव रक्षक, श्री. सर्वेश पवार, श्री. रोहन खेडेकर, श्री. श्वेत चोगले, श्री. सुरज जाधव, श्री. सुमित म्हाप्रळकर, श्री. आकाश उसरे, श्री. प्रथमेश गिमवणेकर, श्री. विशाल सौदर्ये यांच्या मदतीने मगरीला ताब्यात घेवून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
सदरचे बचावकार्य मा.विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती. गिरीजा देसाई ( श्री. वैभव बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली व श्री. प्रकाश गणपती पाटील परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली व त्यांचे अधिनस्त श्री. सुरेश उपरे वनपाल खेड, वनरक्षक, श्री. परमेश्वर डोईफोडे, श्री. रानबा बंबर्गेकर, श्री. अशोक ढाकणे, वन्यजीव रक्षक, श्री. सर्वेश पवार, श्री. रोहन खेडेकर, श्री. श्वेत चोगले, श्री.सुरज जाधव, श्री. सुमित म्हाप्रळकर, श्री. आकाश उसरे, श्री. प्रथमेश गिमवणेकर, श्री. विशाल सौदर्ये यांच्या समवेत पूर्ण केले.
मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्रि क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे.