सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली येथे २० मे २०२३ रोजी जस्ट डायल कंपनीचा भव्य रोजगार मेळावा

Grand Employment Fair of Just Dial Company on 20th May 2023 at Sindhudurg Education Broadcasting Board Engineering College Kankavali

एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालय , कणकवली आणि जस्ट डायल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दिनांक २० मे २०२३ रोजी एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे सकाळी ठीक ११.०० वाजता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुलाखतीसाठी जस्ट डायल कंपनी येणार असून किमान १०० युवकांना रोजगार संधी प्राप्त होण्याची संधी एस एस पी एम इंजिनिअरींग काँलेज, कणकवलीने उपलब्ध करून दिली आहे.

या मुलाखतीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावयाचा आहे मुलाखतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पुढील प्रमाणे असणार आहे विद्यार्थी हा ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट (PGDM, PGDBM, MBA, BBA, BCom, BSC, BA, BTech or BE )असला पाहिजे तसेच अंतिम वर्ष ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी पण मुलाखतीसाठी उपस्थित रहु शकतात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दर महिना वीस हजार ते 25 हजार पर्यंत सॅलरी ऑफर दिली जाऊ शकते.

मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे जसे बायोडाटा,गुणपत्रक,आधार कार्ड, पासपोर्ट फोटो आपल्याबरोबर घेऊन यायची आहेत.

संस्थेचे सचिव माननीय आमदार श्री नितेशजी राणे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या संधीचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण व होतकरू विद्यार्थ्यांनी घ्यावा अशी विनंती केली आहे.
रजिस्ट्रेशन लिंक –
https://forms.gle/Qqe1EFH4wH5Kxe5j9