जिल्हा प्रशासन मान्सूनच्या तयारीला लागले

The district administration started preparing for monsoon

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी रत्नागिरी तथा अध्यक्ष, जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरण श्री.एम.देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मागील 10 वर्षात जिल्ह्यात घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आगामी मान्सून काळात जिल्हयातील सर्वच विभागांनी सतर्क रहाण्याच्या सूचना त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना यावेळी दिल्या. व मान्सूनपर्व तयारीचा विभागनिहाय आढावा घेतला.