स्वित्झर्लंड येथील पर्यटक दांपत्य पोहचले परुळे बाजार येथे जि. प. शाळेत

परुळे : प्रतिनिधी
स्वित्झर्लंड देशांतील एक पर्यटक दांपत्य यानी आपल्या पर्यटन प्रवास दरम्यान परुळे बाजार येथे जिल्हा परिषद शाळा नंबर 3 येथे थांबून काही काळ विद्यार्थी समवेत घालवला.यावेळी त्यांनी मुलांशी इंग्रजी मधून संवाद साधला आणि मुलांनी सुद्धा त्यांना इंग्रजी मधून उत्तर दिले. यामुळे या पर्यटका दांपत्याने त्यांचे कौतुक केले. आणि त्यांच्या समवेत फोटो ही काढला. विदेशी पर्यटकांना भुरळ घालणारी भारतीय संस्कृती व आदरातिथ्य याचा त्यांना नेहमीच आकर्षण राहीले आहे. त्यामुळे बरेच पर्यटक कोकणात आले की असा ठिकाणी नक्की भेट देतात. सध्या गोव्या पेक्षा परदेशी पर्यटकांना कोकण पर्यटन आवडत आहे. या मुलाचे कौतुक करीत असताना त्यांनी शाळेतील शिक्षक वर्ग यांचेही अभिनंदन केले