सावंतवाडी राजवाडा येथे स्वागत समारंभाला उपस्थित राहत केले अभिष्टचिंतन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी संस्थानच्या राजकुमारी उर्वशी व संदीप बोथीरेड्डी यांच्या विवाहाप्रित्यर्थ राजवाडा येथे आयोजित स्वागत समारंभाला महाराष्ट्र राज्याचे बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थानचे राजे खेम सावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखम खेम सावंत भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, उद्योजक श्री. अजय दोडिया, सौ.जयश्री दोडिया, श्री. प्रभाकर बोथीरेड्डी, सौ. जयश्री बोथीरेड्डी आदी उपस्थित होते.








