राजापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील पडवे स्टॉप जवळील बंद घराच्या बाथरूमची काच व आतील दरवाजा फोडून अज्ञात चोरटयाने घरात प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख ९१ हजार ८७६ रूपयांचे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. बुधवारी १७ जुलै रोजी सायंकाळी ४.३० ते रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी फिर्यादी संतोष सहदेव ठुकरूल, रा. पडवे राजापूर यांनी नाटे सागरी पोलीस स्थानकात फिर्याद नोंदवीली आहे. तशी माहिती नाटे पोलीसांनी दिली आहे.
आपण व आपली पत्नी घराला लॉक लावुन बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या वडीलांचे वर्षश्राद्ध कार्यक्रम असल्याने पडवे ठुकरूल वाडी येथील आमच्या जुने घरी गेलेले होतो. तेथे दिवसभर कार्यक्रम व रात्री भजन असल्याने ते आटोपून आपण ११.३० वाजण्याच्या दरम्याने पडवे स्टॉप येथील घरी आले असता, कोणीतरी अज्ञात इसमाने आपल्या घरातील बाथरुमचे काचेच्या स्लायडींगच्या काचा काढुन बाथरुमाचा फोरमाईकचा दरवाजाचे वरील कडी असलेल्या ठिकाणी होल मारुन त्यातुन बाथरुमची बाहेरील कडी काढुन घरात प्रवेश करुन आपल्या घरातील टिव्ही शोकेश मधील कपाटातील पांढऱ्या पिशवीत ठेवलेले सुमारे १,९१,८७६ किंमतीचे सोन्याचे दागीने अज्ञात चोरटयांनी चोरुन नेल्याचे संतोष ठुकरूल यांनी नाटे पोलीसांत दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे.
या दागिन्यांमध्ये १) १,६३,७५०/- रु कींमतीचे ७.२३० मिलीग्रॅम वजनाचे मंगळसुत्रातील पेडल व ४४.४४० मिलीग्रॅम वजनाचे पाच पदरी त्यात काळे मणी असलेले मंगळसुत्र असे मिळून एकुण वजन ५१.६७ मिलीग्रॅम जुने वापरते किं.सु २.) २५,९२६/- रुपये किमतीचे कानातील जोड टॉप त्याचे वजन ८.६१० मिलीग्रॅम वजनाचे जुने वापरते कि.सु ३) २,२००/- रुपये किमतीची सोन्याची नथ जुनी अशा सुमारे १ लाख ९१ हजार ८७६ रूपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे फिर्यादित नमुद केले आहे .
या प्रकरणी नाटे पोलीसांनी गु.र.नं. ५९/२०२४ भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ (क), ३३१(३), ३३१(४) अन्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नाटे पोलीस अधिक तपास करत आहेत.











