खेड(प्रतिनिधी) दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेच्या वतीने २६ व २७ एप्रिल रोजी रत्नागिरी येथील प्रसिद्ध सावंत स्पोर्ट या मैदाना वरती महाराष्ट्रातील निमंत्रीत जिल्हा संघाची कोकण चषक २०२५ या दिव्यांग खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे या स्पर्धे करता रत्नागिरी जिल्हा संघाची निवड दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडू क्रीडा प्रशिक्षक प्रशांत सावंत यांच्या वतीने करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा संघाच्या कर्णधारपदी अष्टपैलू खेळाडू मंदार खैर यांची निवड करण्यात आली आहे
.,उपकर्णधार एकनाथ जोशी,खेळाडू अल्पेश तावडे ,दिपक फुटक,सागर आईनकर,भरत घेवडे, अमित डेरवणकर, सुफियान तांबे, मंगेश चांदणे, सचिन पवार, सिद्धेश तामुंडकर, संजीव पोढकर, अमित फिलसे, अजिंक्य तांबे , राहुल बरे , आदर्श पवार, निलेश रावण, टीम मॅनेजर राजेश धारिया यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी दिव्यांग खेळाडूं साठी एखादी क्रिकेट स्पर्धा व्हावी या स्पर्धेतून जिल्ह्यातील सर्व दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या साठी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग खेळाडू यांनी .मिळून दिव्यांगां साठी असणारी व कधीही वेळेत न मिळणारी दिव्यांग पेन्शन जमा करून या क्रिकेट स्पर्धे साठी निधी जमा करत आहेत
स्पर्धा यशस्वी करण्या करता दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेचे पदाधिकारी,जनार्दन पवार पांडुरंग नाचरे,हर्षद चव्हाण,पल्लवी सावंत ,रेणुका गोरीवले, प्रज्ञा जंगम, संतोष मालसे आदी प्रयत्न करीत आहेत.रत्नागिरी येथे पहिल्यांदाच दिव्यांग खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, क्रीडा मंडळे ,दिव्यांग व्यक्तींच्या संस्था संघटना,तसेच दानशूर व्यक्ती यांनी या दिव्यांग खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन प्रशांत सावंत यांनी केले आहे.









