दुचाकीस्वार जखमी
खेड । प्रतिनिधी :तालुक्यातील भरणे येथे बोलेरोची मोटरसायकल धडक बसून भीषण अपघात झाला आहे .

हा अपघात आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता घडला.
भरणे येथून वेरळ दिशेने जाणाऱ्या मोटरसायकल (क्र. MH 08 BA 0107) ने चिपळूण दिशेला जात असलेल्या बोलेरो पिकअप (क्र. MH 08 AP 3645) गाडीला मागून जोरदार धडक दिली.
यात अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी
खेड भरणे नाका ब्रिज खाली उभी असणारी श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नानिजधाम 24 तास मोफत रुग्णवाहिकेच्या मदतीने मोटर सायकल स्वाराला प्रथम उपचारासाठी रॉयल हॉस्पिटल भरणे येथे दाखल करण्यात आलं आहे
शुभम शंकर जाधव (वय 30, रा. वेरळ) असे जखमी दुचाकीस्वाराने नाव आहे.












