कोकण रेल्वेत मेगाभरती

खेड (प्रतिनिधी) कोकण रेल्वेत रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर वाढलेला कामाचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी
१९० पदांची मेगा भरती करण्याचा
निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यासाठी पदवीधर शिकाऊ तसेच तंत्रज्ञ शिकावू उमेदवार पदांसाठी रितसर जाहिरात देखील काढण्यात आली आहे.

या मेगाभरतीची अंतिम तारीख १०. डिसेंबर असून इच्छूक व पात्र उमेदवारांनी १० डिसेंबरपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासह आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे.
तसेच जाहिरात नोकरीचे स्थान, पगार व निवड प्रक्रियेबद्दल माहिती वाचून घेण्याबाबतही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे