माखजन l वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील प्राचीन अशा श्री देव आमनायेश्वर मंदिरात २३ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी अशा कालावधीत महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आमनायेश्वर मंदिर हे हेमाडपंथी बांधणीचे असून,मंदिराला हजारो वर्षांचा इतिहास आहे.
यामध्ये २३ ला सकाळी ९ वाजता संकल्प,तोरण,रुद्राभिषेक,व पूजा होईल.२३ ते २७ दररोज रात्री १० वाजता ह.भ.प सचिन बुवा साठे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.रोज रुद्राभिषेक,२४,२५ ला रात्री ९ वाजता भजन होईल
२६ ला महाशिवरात्री निमित्त मंदिर आवारात जत्रा भरेल,रात्री ९ वाजता श्रींचे पालखीतून मिरवणुकीने आगमन,पालखी सजावट,दीपमाळ प्रज्वलन, होईल.२८ रोजी सकाळी ११.३०वा.महाप्रसाद होणार आहे.व रात्री आमनायेश्वर प्रासादिक नाट्य मंडळ बुरंबाड पुरस्कृत,समर्थ कृपा प्रोडक्शन निर्मित,आपल्या मनातील रहस्याचा शोध घेणारी उलटी फुलटी कॉमेडी,दोन अंकी हृदय स्पर्शी नाटक ‘ कोन नाय कोनचा’ हे सादर होईल.
मंदिरामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष संजय सहस्त्रबुद्धे, सचिव समीर शिंदे,खजिनदार शशिकांत घाणेकर यांनी केले आहे.










