लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर भाजपाची उद्या सभा

माखजन |वार्ताहर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर दक्षिण मंडळाची भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या नियोजनाची अतिशय महत्वाची बैठक उद्या शनिवार दि.३० मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता देवरुख भाजपा कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला तालुका पदाधिकारी,शक्तीकेंद्र प्रमुख, सुपरवॉरियर्स,बूथप्रमुख,सर्व मोर्चाचे पदाधिकारी,भाजपा कार्यकर्ते यांनी वेळेत उपस्थित् राहावे असे आवाहन संगमेश्वर तालुका दक्षिण विभागाचे अध्यक्ष रुपेश कदम यांनी केले आहे.

या सभेत,विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री प्रमोद अधटराव मार्गदर्शन करणार आहेत.