लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुका मराठा संघाच्या वतीने बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी, ऐतिहासिक देखाव्यांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे .
प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील लांजा तालुका मराठा संघाच्या वतीने शिवजयंती उत्सव हा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता शिवप्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून त्यानंतर लांजा शहरातील केदारलिंग मंदिर येथून शिवप्रतिमेची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे .
तरी या कार्यक्रमात सर्व मराठा समाज बांधव आणि सर्व शिवप्रेमी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन लांजा तालुका मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे आणि सरचिटणीस विजय पाटोळे यांनी केले आहे.











