दापोली तालुक्यातील कीरांबा येथील डोंगराला गेले तडे

 

 

नागरिकांना स्थलांतराचे आदेश

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील किरांबा गावाच्या डोंगराला भेगा पडल्याने ग्रामस्थ बायभित झाले आहेत.

 

या डोंगरा पासून लोकवस्तीला धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थांना रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे.

 

डोंगराच्या भेगा वाढत असल्याने रस्त्यालाही भेगा पडून रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे ,

त्यामुळे नागरिकांना एक किलोमीटर पायपीट करण्याची वेळ आली आहे.

 

तसेच येथील नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.