पोंभुले येथे बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी होणार, ना. नितेश राणे यांची उपस्थिती

देवगड | प्रतिनिधी

देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने आणि जांभेकर कुटुंबीय – पोंभुर्ले यांच्या सहकार्याने दर्पणकार, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती २० फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता पोंभुर्ले येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक सभागृहात पार पडणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर आणि पोंभुर्ले सरपंच प्रियांका धावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याच कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार माधव कदम लिखित ‘मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे.या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर यांनी केले आहे