साखरपा =देवरुख मार्गांवर ट्रकला अपघात. चालक जखमी शंकर वैद्य साखरपा

संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव पासून एक किलोमीटर अंतरावर
साखरपा – देवरुख रस्त्यावर चौदा चाकी ट्रक रस्त्याच्या कडेच्या डोंगराला धडकून झालेल्या अपघातात चालक जखमी झाला असल्याची घटना आज शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार हनुमंत विठ्ठल शिंगटे वय ४६ हा आपल्या ताब्यातील रिकामा ट्रक देवरुख मार्गांवरून कोल्हापुकडे यू पी ३५ ए टी १२९२ जात असताना ट्रकवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगराला धडकला यात चालक ट्रकमध्येच अडकला होता. अपघाताचे वृत्त समजताच देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे ,साखरपा पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस उप निरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौंजदार शांताराम पंदेरे,पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर,यांनी घटनास्थळी धाव घेतली.तसेच पंचायत समिती सदस्य विद्यासागर तांदळे, ग्रामस्थ पारस साखरे, अंकुश सुर्वे,साहिल चव्हाण, मुरलीधर पांचाळ या ग्रामस्थांच्या मधतीने व रवी इम्फ्रा कंपनीच्या हायड्रा मशीनच्या साहाय्याने जखमी चालक हनुमंत शिंगटे याला बाहेर काढले व त्याला साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात आले असून पोलीस कार्यवाही सुरु आहे.