दोडामार्ग l प्रतिनिधी :दोडामार्ग तालुका हौशी क्रिकेट संघाच्या उपाध्यक्ष पदी नेमणूक झाल्याबद्दल श्री शाबी तुळसकर यांचा देवगड तालुका येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा अध्यक्ष श्री अनिल राणे, कोल्हापूर विभाग सचिव श्री गजानन नानचे, कार्याध्यक्ष श्री प्रदीप सावंत, वैभववाडी तालुकाध्यक्ष श्री दीपक हरियाण, मालवण तालुकाध्यक्ष श्री कैलास घाडीगावकर, मुख्याध्यापक श्री माने सर , जिल्हा संघटक निलेश पारकर, पंढरीनाथ आचरेकर, विजय गवस, श्री रामा गवस, कृष्णा लोंढे व सावंतवाडी दोडामार्ग मालवण देवगड कणकवली वेंगुर्ला कुडाळ वैभववाडी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शिक्षकेतर कर्मचारी,शिक्षक,मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.












