भाजपा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची आज ४.३० वाजता संघटन पर्व बैठक

पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची संघटन पर्व बैठक आज शुक्रवार २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृह येथे होणार आहे. या बैठकीला पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यातील विरोधी पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करणार आहेत. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी केले आहे.