Everyone should strive to be a good person: Dr Indu Sawant.
समाजात सुदृढ, आनंदी वातावरण असले पाहिजे, प्रत्येकाने चांगला माणूस बनणे गरजेचे आहे. तसेच त्याने आनंदी राहिले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या माजी संचालिका डॉ. इंदू सावंत यांनी केले. शिरगांव येथील मत्स्य महाविद्यालयात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर मत्स्यशास्त्रज्ञ फिश जेनेटिक्स आणि बायोटेक्नॉलॉजी विभाग, भाकृअनुप-सीआयएफई, मुंबई -डॉ. किरण रसाळ हे विशेष अतिथी तर सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले, त्याचेप्रमाने त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. दबीर पठाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
डॉ.इंदू सावंत यांनी प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सचिव स्वप्निल जाधव ह्याने महाविद्यालयच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. आभार उपसचिव वैष्णवी जाधव हिने मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मत्स्य महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, सर्व कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.













