RATNAGIRI: शिरगाव मत्स्य महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन

Inauguration of Shirgaon Matsya College Annual Reunion

रत्नागिरी : शिरगांव येथील मत्स्य महाविद्यालयात दि.१५ मे रोजी वार्षिक स्नेहसंमेलन ‘स्पंदन २०२३’ महोत्सवाचे उद्घाटन आणि विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या माजी संचालिका डॉ. इंदू सावंत, फिश जेनेटिक्स आणि बायोटेक्नॉलॉजी विभाग, भाकृअनुप-सीआयएफई, मुंबईचे मत्स्य शास्त्रज्ञ -डॉ. किरण रसाळ यांच्या हस्ते करण्यात आला.
यात मुख्यतः जनरल चॅम्पियनशिप ही पदवीच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी पटकावली.
या वेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे यांनी अध्यक्ष स्थानावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. दबीर पठाण यांनी प्रास्ताविक केले.

विविध कला, क्रीडा स्पर्धांमध्ये बक्षीसपात्र विद्यार्थी असे –
प्रश्नमंजुषा -शुभम महाडिक, प्रणय मरदे, वक्तृत्व- महेश शेतकर , वादविवाद स्पर्धा- चांदणी रॉय दत्त, हस्ताक्षर – सेजल आरोंदेकर (मराठी), मानसी भोसले( इंग्रजी), निबंध स्पर्धा – कुणाल पिंगट (मराठी), तनाया समदुरकर (इंग्रजी), चित्रकला – अमिषा आंबेरकर, बुद्धिबळ स्पर्धा महिला – स्वेक्षा चौहान, पुरुष – भाविकसिंग परमार,
कॅरम महिला – वर्षा गांवकर, पुरुष – साई कोळी , टेबल टेनिस महिला – चांदणी रॉय दत्त, पुरुष – वैभव गोटे,
बॅडमिंटन महिला – लक्षिता कोळी, पुरुष – सौरभ रावुल, बॅडमिंटन डबल महिला – श्वेता मांगले, संगीता अझमीरा पुरुष – सौरभ रावुल, ओमकार कोडे, गोलाफेक स्पर्धा महिला – चैताली इंसूलकर , पुरुष – गौरव लांजेवार, डिस्कस थ्रो स्पर्धा महिला – प्राजक्ता राजगे, पुरुष – गौरव लांजेवार , भाला फेक स्पर्धा महिला – लक्षिता कोळी, पुरुष – धीरज कोल्हे.
त्याचप्रमाणे संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. बी. जी. देसाई शिक्षण संचालक डॉ. बासाकोकृवि यांच्या हस्ते करण्यात आले.