खेडमध्ये कारच्या चाकांसह अन्य भाग विकून लाखोंचा अपहार

खेड (प्रतिनिधी)
तालुक्यातील कळंबणी येथे मालमत्तेचा अपहार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 जयसिंग रोंगाजी कांबळे (७५) यांनी या संदर्भातील तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. जयसिंग कांबळे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांची बंद पडलेली तवेरा गाडी दुरुस्त करून देतो, असे संशयित  वसीम अब्दुल्ला तांबे (रा. भरणे, ता. खेड) याने सांगितले. संशयिताने त्यांचा विश्वास संपादन करून त्यांची तवेरा कार दुरुस्तीसाठी ताब्यात घेतली. मात्र, त्यांना कोणतीही कल्पना न देता त्यांच्या गाडीचे दोन नवीन कॉन्टिनेंटल कंपनीचे टायर काढून त्या ठिकाणी एम. आर. एफ. कंपनीचे जुने टायर लावले. तसेच गाडीचे इंजिन उघडून त्याचेही काही सुटे भाग काढून टाकले. यामुळे कांबळे यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१६ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.