खेड (प्रतिनिधी)तालुक्यातील भरणे येथील शामराव सहकारी पतसंस्था प्रकरणी संस्थेच्या ठेवीदारांनी येथील सहायक निबंधक सुनील मोरे यांना घेराव घातला. लेखा परीक्षण अहवालाला होत असलेल्या विलंबाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
खेड तालुक्यातील शामराव नागरी सहकारी पतसंस्था आर्थिक • डबघाईत गेल्यानंतर ठेवीदारांनी ठेवी मिळवण्यासाठी आक्रमक पवित्र घेतला आहे. या प्रकरणी २१ रोजी सहाय्यक निबंधक सुनील मोरे यांची ठेवीदारांनी भेट घेतली. यावेळी ठेवीदारांनी निबंधक यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत संस्था पदाधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात कारवाईची मागणी करत निबंधक यांनी ठेवीदारांना ठेवी मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी निबंधक सुनील मोरे यांनी या संस्थेबाबत ठेवीदारांना निबंधक कार्यालयाकडून जे सहकार्य लागेल ते करण्याचे आश्वासन दिले.











