सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पंचायत राज संस्था व समुदाय स्तरीय संस्था अभिसरण प्रकल्प सावतंवाडी तालुक्यातील अनमोल प्रभागसंघ तळवडे अंतर्गत ज्योती ग्रामसंघ ब्राम्हणपाट व मळगाव ग्रामपंचायत यांच्या सयुक्त विद्यमाने ‘मायापूर्वचारी बालसभे ‘ची स्थापना करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक मेंटोर गिरीजा संतोष यांनी बालसभेचे उद्देश, नियोजन व महत्त्व स्पष्ट करून सांगितले.
यावेळी त्यांनी बाल सभेची कार्यप्रणाली कशी असावी याबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे प्रभाग समन्वयक सचिन नाईक यांनी बालसभेअंतर्गत कोणते उपक्रम राबवायचे आहे याचे मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने ६ ते १८ वयोगटातील सर्व बालकांनी बालसभा हे हक्काचे व्यासपीठ म्हणून कशाप्रकारे काम करायचे आहे हे स्पष्ट करून सांगितले.
या बालसभेला मायापूर्वचारी बालसभा म्हणून नाव देण्यात आले. बालसभेसाठी अध्यक्ष म्हणून तनिष्का संदेश राऊळ, कोषाध्यक्ष सार्थक दिलीप राऊळ, सचिव नेहा राजेंद्र राऊळ, सहसचिव सहदेव संतोष राऊळ, उपाध्यक्ष कविश सावळाराम पेडणेकर यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या बालसभेतील अध्यक्ष तनिष्का राऊळ यांनी सभा महिन्यातील दुसऱ्या रविवारी घेण्याचे सुचविले व सर्व सदस्यांनी त्यास अनुमोदन दिले.
यावेळी स्थानिक ग्रा.प.सदस्या
सौ. निकीता राऊळ उपस्थित होत्या. तसेच प्रभाग समन्वयक सचिन नाईक, मेंटोर गिरीजा संतोष, ग्रामसंघ अध्यक्ष संगिता राऊळ, सचिव हर्षदा पेडणेकर, सीआरपी रत्नप्रभा नाईक, एल आरपी निकीता बुगडे व ग्रामसंघातील महिला उपस्थित होत्या.












