रत्नागिरी : रत्नागिरीतील टिळक आळी गणेशोत्सव मंडळ शताब्दी महोत्सवात दर महिन्याला सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम सादर होणार आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत रविवार दि. २ मार्च २०२५ रोजी महा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबीरात रक्तदान शिबीर, शुगर तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, हाडांच्या खनिज घनता तपासणी, दंत तपासणी, नेत्र तपासणी होणार आहे. या शिबीसाठी दंत चिकित्सक अद्वैत देशपांडे आणि नंदादीप आय हॉस्पिटलचे सहकार्य लाभणार आहे.
तरी या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन टिळक आळी गणेशोत्सव मंडळाने केले आहे.











