दोन होळी स्पेशलचे आरक्षण खुले

खेड (प्रतिनिधी)
शिमगोत्सवात रेल्वे गाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या सीएसएमटी मुंबई-मडगावसह।एलटीटी-मडगाव होळी स्पेशलचे २४ फेब्रुवारी रोजी आरक्षण खुले झाले आहे.
०११५१/०११५२ क्रमांकाची सीएसएमटी-मुंबई स्पेशल ६ व १३ मार्चदरम्यान तर ०११२९/०११३० क्रमांकाची एलटीटी-मडगाव स्पेशल १३ व २० मार्च रोजी धावणार आहे. या दोन्ही  स्पेशल गाड्यांची आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी सोमवारी तिकिट खिडक्यांवर झुंबड उडाली होती.