चिपळुणात २६ पासून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा

चिपळूण (प्रतिनिधी):-– येथील श्री शेखर निकम मित्र मंडळच्यावतीने शहरातील पवन तलाव मैदानात २६ ते २८ या कालावधीत भव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील नामवंत संघ व खेळाडू या स्पर्धेनिमित्त येणार आहेत.

या स्पर्धेचे पहिलेच वर्षे असून एकूण १२ संघांचा या स्पर्धेसाठी समावेश आहे. २६ रोजी सकाळी ९ वाजता आमदार शेखर निकम यांच्याहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, विनय नातू, माजी जिल्हाध्यक्ष सचिन कदम, माजी तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, ‘राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नितिन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, मर्चेंट नेव्ही चिफ इंजिनिअर इम्रान कोंडकरी, युवा उद्योजक योगेश पवार आदीसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्यां संघाला रोख रक्कमेसह चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे. या स्पर्धेनिमित्त राज्यातील नामवंत संघ व खेळाडू येणार असून त्यांचा खेळ चिपळूणवासियांना पहाता येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बरकत पाते यांनी दिली.