आमच्या विकासाच्या प्रयत्नाला साथ द्या, खा.नारायण राणे यांची जनतेला साद

सिंधुदुर्ग ही देवांची भूमी – खासदार नारायण राणे

कुणकेश्वर | प्रतिनिधी

“सिंधुदुर्ग ही देवांची भूमी आहे. येथील देवतांच्या आशीर्वादामुळेच आम्ही राजकारणात यशस्वी ठरलो आणि लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. या भूमीची सेवा करणे, ही आमची जबाबदारी आहे. नामदार नितेशजी राणे आणि आमदार निलेश राणे जिल्ह्यात लोकसेवा करत आहेत. आम्ही करत असलेल्या प्रयत्नांना तुम्ही साथ द्या,” असे मत खासदार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.

खासदार नारायण राणे यांनी श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत नीलमताई राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे उपस्थित होते.

खासदार नारायण राणे यांचा सत्कार श्री देव कुणकेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली यांनी केला.

यावेळी भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.