सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
गावातील विविध रस्ते पाणी वीज या विकास कामांबरोबर रोजगाराच्या व विविध कामातून दर्जेदार काम करून दहा वर्षातील बॅक लॉक पूर्ण भरून काढू शिवसेना संघटनेची दर्जेदार बांधणी करून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जिंकायच्या आहेत कुडाळ मालवण मतदार संघ राज्यात आदर्श मतदारसंघ मॉडेल बनविण्याच्यादृष्टीने काम करूया असे आवाहानात्मक प्रतिपादन शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी केले.
ओरोस येथील गोविंद सुपर मार्केट संकुल येथे आमदार निलेश राणे यांच्या संपर्क कार्यालया जवळ वालावल ,कडावल आणि मालवण ग्रामीण रुग्णालयाना शव पेट्या, ओरोस ग्रामपंचायतीला घंटागाडी तसेच वेताळबांबर्डे कदमवाडी शाळेला संगणक वितरण कार्यक्रम आमदार निलेश राणे यांच्या प्रपुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी प्रिमियल चारीटेबल ट्रस्टचे मुंबई येथील मरबारहिलचे शाखा प्रमुख विजय घरत, माजी जि. प.अध्यक्ष संजय पडते, दीपलक्ष्मी पडते, दादा साईल, देवेद्र सामंत, ओरोस सरपंच आशा मुरमुरे उपसरपंच पांडुरंग मालणकर, सुप्रिया वालावलकर, रानबांबुळी सरपंच परशुराम परब आदीसह अन्य ग्रामपंचायत सरपंच ग्रामस्थ उपस्थित होते
आमदार निलेश राणे म्हणाले प्रिमियल चारीटेबल ट्रस्टचे विजय घरत यांनी दिलेल्या आता पर्यंत त्यांनी कोकणात दहा शवपेट्या आणि औषधांचा पुरवठा केला आहे त्यांचे शवपेट्या देणे किवा औषध देणे तेवढे काम नाही तर मुंबईत त्यांनी उतम समाज कार्य केले आहे आणि ते अविरत सुरू आहे संजय पडते आता योग्य पक्षात आले आहेत माझे नाते कधीच तुटले नाही त्याचा शिवसेनेला फायदा होईल या मतदारसंघा साठी संघटनात्मक काम करता येईल आणि जिल्ह्याच्या विकासात आता गती येईल भविष्यात कुडाळ मालवण हा मतदारसंघ राज्यात आदर्श मॉडेल बनेल
माजी जि प अध्यक्ष संजय पडते म्हणाले की ग्रामीण भागात अशा प्रकारच्या शित शवपेट्या महत्त्वाच्या आहेत हा समाज कारणाचा भाग आहे ग्रामिण भागात हे चांगल काम आहे परत मी राणे कुटुंबात आलो यापूर्वीही राणे कुटुंबातच मी घडलो त्या राणे कुटुंबात आलो यश अपयश असत आता पुढील यश कायम राहील माझ्या प्रवेशा नंतर अनेक जनाचे फोन येत आहेत आपण शिवसेना या संघटनेच्या माध्यमातून काम करूया ३८ पी एस सी शवपेट्या उपलब्ध होणे ही काळाची गरज असून शिवसेना पक्ष वाढीच्या दृष्टीने गावागावात संघटना वाढवूया व संघटनात्मक दर्जेदार काम करूया असे सांगितले. यावेळी तिन शवपेट्या आणि ओरोस ग्रा. प. ला घंटागाडी वितरण आमदार निलेश राणे याच्याहस्ते केले












