दापोलीतील २१३ मतदान केंद्रांवर मतदानास झाली सुरुवात

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक करिता प्रशासन झाले सज्ज

दापोली | प्रतिनिधी 
दिनांक ०७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकांकरिता मतदान होणार आहे.
या मतदानाकरता दापोली मतदारसंघा करिता दापोली तालुका प्रशासन सज्ज झाले आहे .
त्यानुसार दापोली तालुक्यामध्ये एकूण सहा जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि बारा पंचायत समिती निर्वाचन गणामध्ये निवडणूक होत आहे.
त्याकरिता एकूण २१३ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांवर एकूण ९३६ अधिकारी आणि कर्मचारी हे काम पाहणार असून २१३ शिपाई आणि २८७ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रमाणे २१३ मतदान केंद्रांवर प्रत्येकी एक कंट्रोल युनिट आणि एक बॅलेट युनिट देण्यात येणार आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ३४ क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे मतदान यंत्रात बिघाड झाल्यास एकूण ६६ राखीव EVM यंत्रे देण्यात आली असल्याची माहिती दापोली तहसीलदार अर्चना बोंबे यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली आहे.