खेड(प्रतिनिधी) सध्या बॉक्स ऑफिसवर छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावरील छावा हा सिनेमा तुफान गर्दी खेचत आहे आपल्या राजाची गोष्ट मोठया पडदयावर पाहण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने हा चित्रपट पाहत आहे मात्र तालुक्यातील खवटी मंडलिकवाडी येथील पवन अनिल मंडलिक या तरुणाने तर गावातील ग्रामस्थांना मोफत सिनेमा पाहण्यासाठी पुढाकार घेऊन तो येथील सिनेमा गृहात दाखवला इतकं च नव्हे तर प्रवास व नाष्टा ही मोफत दिला.
गावातील लोक सहसा कोणताही चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये जात नाहीत आणि छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान गावातील तरुण पिढी व ग्रामस्थांना समजायला पाहिजे यासाठी पवनने आपल्या मुंबईत।राहणाऱ्या सर्व चाकरमान्यांना विनंती केली की आपण एक किंवा दोन तिकीट आपण द्यावे जेणेकरून गावातील सर्व लोकं चित्रपट पाहायला जातील आणि सर्व मुंबईतील चाकरमान्यांनी त्याला मदत केली आणि हा चित्रपट मोफत गावातील सर्व लोकांना बघायला मिळाला.त्यांच्या या सामाजिक बांधिलकी चे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे












