सौ वर्षा ढेकणे, सचिन लांजेकर यांच्या पुढाकाराने आयोजन
शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी प्रभाग क्रमांक 14 मध्ये महाकुंभतीर्थ दर्शन सोहळा सौ वर्षा परशुराम ढेकणे व सचिन शशिकांत लांजेकर यांच्या पुढाकाराने पार पडला.
समाजातील अनेक जण या संगमाला प्रत्यक्षरीत्या काही कारणानिमित्त जाऊ शकत नाही आणि या स्नानाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकत अशाकरिता किमान या त्रिवेणी संगम ठिकाणचे तीर्थ दर्शन व्हावे याकरिता प्रभाग क्रमांक 14 मधील दत्त मंदिर येथे महाकुंभ तीर्थ दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी प्रभाग क्रमांक 14 मधील लहान थोर ज्येष्ठांनी तसेच सर्व रहिवाशांनी महाकुंभ तीर्थ दर्शन सोहळ्याचा लाभ घेतला











