खेडमध्ये राजकीय पदाधिकाऱ्यास मारहाण, २५ जणांवर गुन्हा

 
खेड(प्रतिनिधी)
गैरकायदा जमाव करत राजकीय पदाधिकाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी अत्ताउल्ला तिसेकर याच्यासह २५ जणांवर येथील पोलीस ठाण्यात   गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. याबाबत किरण तायडे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
तायडे हे हनुमान पेठेतील स्वतःच्या आधारकार्ड केंद्रात कामासाठी आले होते. याचदरम्यान, कामानिमित्त एक महिला कार्यालयात आली होती. सायंकाळच्या सुमारास शटर बंद करत दोघेजण आतमध्ये आक्षेपार्ह वर्तन करत असल्याचा समज करत तायडे यांच्यासह तरुणीला नातेवाईक व नागरिकांनी कार्यालयातच कोंडून ठेवले. पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर तायडे यांना पोलीस स्थानकात नेत असताना जमावाने  मारहाण केली होती.
कपडे देखील फाडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. २५ हून अधिक जणांनी बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार तिसेकर यांच्यासह २५ जणांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात महिलांचाही समावेश असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांकडून मारहाणकर्त्यांचा शोध घेण्यात येत असून यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत.मारहाणकर्त्यांवर लवकरच अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत