चिपळूण अर्बन बँकेकडून शालेय व महाविदयालयीन विदयार्थ्यांकरींता सेव्हींग ठेव योजनेचा शुभारंभ

चिपळूण (प्रतिनिधी):– बँकांच्या सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याच्या नात्याने बँकेकडून सभासद, ठेवीदार, कर्जदार यांना उत्तम सेवा देणेसाठी बँकेकडून वेगवेगळे नाविन्यपुर्ण उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणुन सध्याच्या डिजीटल युगामध्ये आर्थिक साक्षर होणेकरीता बँकेने अभिनव उपक्रम म्हणून महाविदयालयीन विदयार्थ्यांकरीता यंग स्टार किशोरवयीन बचत खाते व शालेय विदद्यार्थ्यांकरीता स्मार्टकिड्स स्टार अल्पवयीन वचत खाते योजनेचा शुभारंभ केला आहे.

शालेय विदयार्थ्यांची सेव्हींग ठेव खाती उघडली जाऊन त्यांना बँकींगच्या प्रवाहात आणणे तसेच त्यांना बचतीची सवय लावून बैंकींग व्यवहाराची माहिती देणे हा सदर योजनेचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती अध्यक्ष मोहन मिरगल यांनी दिली.

स्मार्टस किड्स स्टार या योजनेमध्ये १० वर्ष पुर्ण ते १८ वर्ष वयोगटातील मुलांची सेव्हींग ठेव खाती व यंग स्टार या योजनेमध्ये १८ वर्ष ते २५ वर्ष वयोगटातील मुलांची सेव्हींग ठेव खाती उघडणेत येतील. तसेच एटीएम मोबाईल बँकिंग, यूपीआय इतर सुविधेचा लाभ घेता येईल.

शुभारंभाकरीता उपस्थित असलेल्या मान्यवरांना तसेच शैक्षणिक सस्थांचे प्रतीनिधी यांना सदर योजनेची माहिती देणेत आली व आपले संस्थेतील विदयार्थ्याची खाती उघडणेबाबत त्यांना आवाहन करणेत आले. तसेच अधिक माहितीकरीता बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क करून जास्तीत जास्त शालेय व महाविदयालयीन विदयार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष मोहन मिरगल यांनी केले आहे.

यावेळी बँकेच्या उपस्थित माजी संचालकांनी बँकेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून बँकेकडून राबविणेत येत असलेल्या विविध उपक्रमाबददल सर्व संचालक व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले.

यावेळी मोहन मिरगल, उपाध्यक्ष रहिमान दलवाई, कोअर कमिटी सदस्य सुचयअण्णा रेडीज, वोर्ड ऑफ मॅनजेमेंटचे अध्यक्ष सतिश खेडेकर, संचालक संजयशेठ रेडीज, सौ. राधिका पाथरे, निहार गुढेकर, सुनिल खेडेकर, रत्नदिप देवळेकर, राजेश केळसकर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य मधुसुदन माने, डीबीजे कॉलेजचे चेअरमन मंगेश तांबे, माजी संचालक रघुनाथ दादा मिरगल, विलास चिपळूणकर, डॉ. दिपक विखारे, अशोक गांधी, अविनाश पोंक्षे, सौ. छाया खातू, सौ. शिल्पा जागुष्टे तसेच श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मल्लेश लकेश्री, श्री. सिध्देश लाड व बँकेचे सिनिअर ऑफिसर संजय कामेरकर, प्रशासन विभागप्रमुख समीर जंगम, अधिकारी ओकांर पाथरे व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.