छावा’ चित्रपट मळगावात हाऊसफुल्ल…

न्हावेली – श्रेयस गावडे : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व त्यांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट भिल्लवाडी गृप व मळगाव ग्रामस्थ यांच्याकडून १ मार्चला मळगाव येथील छञपती शिवाजी महाराज चौक येथे एलईडी स्क्रिन वर दाखविण्यात आला, या चित्रपटाला मळगाव गावातील लोकांसह आजूबाजूच्या गावातील लोकांनी हजारोंच्या संख्येने मोठी गर्दी केली होती. चिमुकल्या मुलांपासून जेष्ठ नागरीकांपर्यंत सर्वांनी उपस्थित राहून छञपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला.

अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाई यांची दमदार भूमिका साकारलेल्या ‘छावा’ चित्रपटाला मळगावात तुफान प्रतिसाद लाभला.
चित्रपटात छत्रपती संभाजीराजे यांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर औरंगजेब छळ करत होता. हे दृश्य पाहताना उपस्थित लोकांच्या डोळ्यांत अश्रू तरळतात. चित्रपटाद्वारे छञपती संभाजी महाराज यांचा इतिहास मळगावसह आजूबाजूच्या गावातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भिल्लवाडी गृप चे अध्यक्ष तथा समाजसेवक श्री.पांडुरंग राऊळ यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी व मळगाव ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली त्यासाठी चित्रपटाला उपस्थित लोकांनी, शिवप्रेमींनी कौतुक केले.