दुर्गवीर संस्थेमार्फत गडकोट छायाचित्र प्रदर्शनला प्रतिसाद

खेड(प्रतिनिधी)
तालुक्यातील घाणेखुंट लोटे, येथील ।एम. इ. एस. कॉलेज ऑफ नर्सिंग, दुर्ग वीर संस्थे मार्फत  गडकिल्ले छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
विविध तीन बॅच मध्ये प्रेझेंटेशन आणि फोटोंच्या माध्यमातून अपरिचित गड किल्ले आणि आणि  करत असलेल्या गड संवर्धनाची माहिती देण्यात आली. या उपक्रमाला शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सदर उपक्रमासाठी श्री. मिथून दिवेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रोफ. शिवप्रसाद हेलेमणी, यांनी दुर्गवीरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गड संवर्धन कार्यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले. या वेळी दुर्गवीर चे रोहित बालडे, स्वप्निल पाडावे, राकेश इंदुलकर, स्वप्निल गायकवाड, संस्कृती पाडावे, राजेश चव्हाण, वेदश्री इंदुलकर हे उपस्थित होते.हा कार्यक्रम करण्यासाठी एम इ एस चे प्रिन्सिपॉल श्री. मिलिंद काळे यांचे मार्गदर्शन लाभले