कोळंब-आडारी सागरी महामार्ग लगत समस्या : माजी नगरसेवक दीपक पाटकर व खारभूमी अधिकाऱ्यांनी केली पाहाणी
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून यापूर्वीच बंधारा दुरुस्तीकाम मंजूर : लवकरच काम सुरु होणार
मालवण | प्रतिनिधी : मालवण कोळंब-आडारी सागरी महामार्ग लगत मोठया प्रमाणात उधाणाचे खारे पाणी परिसरातील जागांमध्ये घुसले आहे. याबाबत नागरिकांनी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचे लक्ष वेधताच दीपक पाटकर यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहाणी केले.
दरम्यान, आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. तसेच याठिकाणी आडारी खाडीला जोडून असणाऱ्या धुरीवाडा यां खारभूमी बंधाऱ्याची दुरुस्ती लवकरच केली जाणार असून नादुरुस्त झडपे ही बदलली जाणार आहेत. आमदार निलेश राणे यांच्या सुचनेनुसार यापूर्वीच हे काम मंजूर झाले असून लवकरच कामाला सुरवात होणार आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी दीपक पाटकर व उपस्थित अधिकारी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. काही अंतरावर नगरपरिषद हद्दीत एका ठिकाणी पूर्वी खारे पाणी अडवण्यासाठी बंधारा घालण्यात आला होता. मात्र तो पूर्णपणे पडझड होऊन गेला. याठिकाणी नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ काही उपाययोजना करता येतील का याबाबत प्रयत्न करावेत. अशीही भुमिका नागरिकांनी मांडली.प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येईल असे दीपक पाटकर यांनी सांगितले.
दीपक पाटकर म्हणाले, याठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात तसेच येथील खारबंधारा नादुरुस्त झडपे दुरुस्ती व बंधारा दुरुस्ती याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांचे काही महिन्यांपूर्वी लक्ष वेधण्यात आले होते. त्यांनी त्यावेळी दिलेल्या सुचनेनुसार खारीभूमी विभागाच्या वतीने बंधारा दुरुस्ती काम निश्चित झाले. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्य आणि आमदार निलेश राणे यांची कार्य तत्परता यामुळे हे शक्य असल्याचे दीपक पाटकर म्हणाले. तसेच येथील काम लवकरच सुरु होईल. येथील समस्या सोडवण्यात येईल असे दीपक पाटकर यांनी सांगितले. खारभूमी विभागाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती पाटील व संपुर्ण टीमचे सहकार्य लाभले असे सांगत दीपक पाटकर यांनी आभार मानले.












