अखेर तारामुंबरी मिठमुंबरी पुलावरून धावली लालपरी!

प्रवासी वर्गातून होत आहे पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष अभिनंदन

देवगड (प्रतिनिधी)

सिंधुदुर्ग पर्यटनासाठी महत्त्वाचा दुवा ठरलेला आणि दोन पर्यटन तालुक्यांना जोडणारा तारामुंबरी-मिठमुंबरी खाडीवरील पूल हा पर्यटनाचा सागरी सेतू म्हणून प्रसिद्ध आहे. या पुलावरून सर्वसामान्य वाहतूक सुरू झाली असली, तरी एस.टी. प्रवासी वाहतूक सुरू होण्याची प्रतीक्षा अनेक वर्षांपासून होती.

अखेर ही सात वर्षांची प्रतीक्षा संपली! पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार लालपरी या सागरी सेतूवरून धावली.

आज देवगड आगारातून तारामुंबरी-मिठमुंबरी पुलावरून जाणाऱ्या देवगड-कुणकेश्वर-देवगड या एस.टी. प्रवासी फेरीचा शुभारंभ आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवर –

  • स्थानक प्रमुख श्रीकांत सैतावडेकर
  • वाहतूक नियंत्रक तुकाराम देवरुखकर
  • चालक व्ही. एस. उन्हाळकर
  • वाहक पी. पी. घाडी
  • तसेच प्रवासी वर्ग

एस.टी. फेऱ्यांचे वेळापत्रक –

सकाळी:

  • ९:३० – देवगड ते कुणकेश्वर
  • ९:४५ – कुणकेश्वर ते देवगड

दुपारी:

  • १:०० – देवगड ते कुणकेश्वर
  • १:१५ – कुणकेश्वर ते देवगड

सायंकाळी:

  • ५:३० – देवगड ते कुणकेश्वर
  • ५:४५ – कुणकेश्वर ते देवगड

प्रवासी वर्गाला मोठा दिलासा!

या पुलावरून एस.टी. वाहतूक सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. फेरीच्या तिकीट दरात बचत होणार असल्याने आर्थिकदृष्ट्याही प्रवाशांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.

आगार व्यवस्थापकांचे आवाहन –

“या नवीन फेरीचा प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असे आवाहन आगार व्यवस्थापकांनी केले आहे.